Posts

Showing posts from August, 2020

भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

प्रस्तावनाखंड  : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग ) प्रकरण ५ वें. भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम. आतां आपण सिलोन व ब्रह्मदेश यांहून कमी परिचित अशा प्रदेशांकडे वळलें पाहिजे. अफगाणिस्तान, तार्तरी, सायबेरिया, बलुचिस्तान, कांबोजान्त पूर्वदेश, तसेंच जावा, बलि, सेलबिस, लाँबक, बोर्निओ इत्यादि आग्नेयीकडील द्वीपें आणि मादागास्कर हें नैऋत्येकडील द्वीप या संबंधानें आतां माहिती करून घेऊं. ज्या स्थलाविषयीं थोडीच माहिती उपलब्ध आहे तेथें भारतीय संस्कृतीचा पूर्वींचा विस्तार आणि आजकालचें त्या देशाकडे होणारें प्रयाण यांचें विवेचन करतांना विषयपृथक्त्व राखण्याची जरूर नाहीं. अशा स्थलांसंबंधानें भारतीय संस्कृतीच्या प्राचीन कार्यांचे व त्यांच्या परिणामांचें वर्णन करतांना अनुषंगानें तेथील अर्वाचीन भारतीयांची माहिती दिली आहे. या विषयास प्रारंभ करण्यापूर्वीं हिंदुस्थान सरकाराच्या सत्तेखालीं असलेल्या आणि त्यामुळें हिंदुस्थानांतीलज समजल्या जाणार्‍या एका भागाकडे त्या भागाच्या अल्प महत्त्वामुळें दुर्लक्ष होऊं नये म्हणून लक्ष दिलें पाहिजे. या भागांत हिंदूंची वस्ती हिंदूंस मोठी अभिमानास्पद नाहीं...

हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.

प्रस्तावनाखंड  : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग ) प्रकरण ४ थें. हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश. हिंदुस्थानाच्या जवळील भागांचा म्हणजे ब्रह्मदेश, सिंहलद्वीप, मलायीद्वीपकल्प इत्यादि भागांचा विचार करतांना आपणांस दोन थर लक्षांत घ्यावे लागतात. एक सांस्कृतिक दृष्ट्या जे भारतीय आहेत अशा तद्देशीयांचा आणि दुसरा आजच्या मुसुलमानांनीं आणि ख्रिस्त्यांनीं युक्त अशा अर्वाचीन भारतीयांचा. या दोन्ही प्रकारच्या लोकांसंबंधानें आज येथें स्थानबद्ध झालेल्या हिंदु जनतेंत निश्चयात्मक भावना नाहींत. संस्कृतिविस्ताराचें काम बंद पडलें असल्यामुळें वरील देशांत नवीन जाणार्‍यांचा आणि तेथील देश्यांचा संबंध जोडणार्‍या चळवळी मुळींच नाहींत. यासाठीं या दोन प्रकारच्या लोकांचें ज्ञान आज आपणांस पृथकपणें मांडलें पाहिजे. जे आपले लोक तिकडे नवीन गेले आहेत त्यांच्याशीं आपलें अधिक जिव्हाळ्याचें नातें असेल आणि आहेहि; आणि यामुळें त्यांच्या हिताहिताविषयीं थोडीबहुत जागृति आपणांस दिसते; पण तिकडील देश्य लोकांसंबंधानें आपण आज उदासीन आहों. तथापि हरवलेल्या कोंकराच्या भेटीविषयीं अधिक आतुरता दाखविणार्‍या ख्रिस्ती कथेंतील मेंढपाळाची वृत्त...

हिंदुस्थान आणि जग

प्रस्तावनाखंड  : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग ) प्रकरण ३ रें. हिंदु आणि जग . हिंदुस्थान आणि जग यांचा परस्परसंबंध लक्षांत येण्यासाठीं ज्या गोष्टींची माहिती आपणास पाहिजे त्यांत (१) हिंदुस्थानचें जगापासून पृथक्त्व आणि त्याचा जगाशीं संबंध व (२) हिंदुसमाज आणि त्याचें पृथक्त्व आणि संबंध या दोन गोष्टी मोडतात. या दोन्ही गोष्टी समजण्यासाठीं हिंदुस्थान आणि हिंदु या शब्दांचे अर्थ समजले पाहिजेत. हिंदुस्थानाची आज ब्रिटिश हिंदुस्थान आणि ब्रिटिश छत्राखालील संस्थानें ही राजकीय व्याख्या घेऊन, हिंदुस्थान आणि जग यांचा राजकीय संबंध या विषयावर विवेचन केलेंच आहे. आतां हिंदुजनतेविषयीं विचार करूं. हिंदू आणि हिंदू नसलेले इतर लोक  :— यांतील भेद काढावयाचा हें शास्त्रीय दृष्ट्या बरेंच कठीण काम आहे. शास्त्रीयसंज्ञा असतात त्या एका शब्दांत अनेक अर्थ व्यक्त करण्यासाठीं असतात. जगांतील निरनिराळ्या लोकांतील सादृश्य आणि भेद यांचें ज्ञान हें ज्ञेय आहे. सादृश्य एका शब्दांत व्यक्त करण्यासाठीं संज्ञा बनतात. मनुष्यसमूहांत जें एकत्व उत्पन्न होतें तें कशामुळें होतें हें जाणणें अवश्य आहे. समाजाची स्थिती फार गुंतागुंत...